न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिं. चिं. मनपाचे प्रभाग क्रमांक एकचे नगरसेवक कुंदन अंबादास गायकवाड यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गायकवाड यांचे नगरसेवक पद रद्दचा आदेश पारित केला आहे.
त्यांनी चिखली प्रभाग क्रमांक १ मधून अनुसूचित जातीकरीता राखीव प्रवर्गातून महापालिकेची निवडणूक लढवली होती. गायकवाड यांना दिलेले सर्व भत्ते महापालिका वसूल करणार आहे. महानगरपालिकेला प्रभाग क्रमांक १ च्या ‘अ’ जागेवर पोटनिवडणूक घ्यावी लागणार असून या निकालामुळे इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.















