न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जुलै २०१९) :- पुणे वेधशाळेने अति पर्जन्यवृष्टीचा इशारा दिलेला आहे. राज्यात संततधार पाउस पडत असल्यामुळे मागच्या २-४ दिवसात पुणे, मुंबई, कल्याण डोंबिवली व नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील इमारतीची सीमाभिंत/पाण्याची टाकी कोसळून बांधकाम मजूर व नागरिकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. त्यातील मृतांचा आकडा ४५ पेक्षाही अधिक आहे.
याबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेने खबरदारी व सावधगिरीचा उपाय म्हणून शहरातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती, नाल्यालगत/नदीलगत/संरक्षक भिंतीलगत /चालू खोद्कामलगत घरे व झोपड्या यांची पाहणी करावी. तसेच धोका उत्पन्न होता असल्यास तेथील धोकादायक भाग तातडीने हटविण्यात यावा.
तसेच त्या ठिकाणच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊन, त्यांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्याची खबरदारी व कार्यवाही हाती घ्यावी असे, स्वी. नगरसेवक संजय वाबळे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.















