न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जुलै २०१९) :- प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये पालखी सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. पाचवी, सहावीचे विद्याथीं वारकऱ्यांच्या वेशभूषेत उपस्थित होते. तसेच काही विद्यार्थी विविध संतांच्या वेशभूषेत उपस्थित होते. हा सोहळा इतका नयनरम्य होता की, जणू काही साक्षात विठ्ठल, रुख्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत एकनाथ उभे आहेत असा भास होत होता.
या सोहळ्यासाठी मुख्याध्यापक संगिता लकारे, उपमुख्याध्यापिका रोहिणी काळे, पर्यवेक्षिका सीमा कुलधरण यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच समिती मधील सर्व सदस्य सुमिता पाटील, रेखा खेडेकर, कांचन गवारी, जयश्री देसाई, सुनिता शिरसाट, वासंती विभांडिक, राजश्री सोनवणे, विजय पाचारणे, वृषाली सलगर यांचे सहकाऱ्यांनी हा सोहळा उत्साहात पार पडला.
संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे व सहकार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.











