न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जुलै २०१९) :- चिंचवडमधील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात ‘ईव्हिएम हटाओ, देश बचाओ’ या ईव्हिएम विरोधी राष्ट्रीय जनआंदोलनाच्या माध्यमातून ”ईव्हिएमचे सत्य” या जाहीर कार्यक्रमाचे मंगळवार (दि. १६) रोजी सायं. ५ वा. आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात राजकीय कार्यकर्त्यांचे ईव्हिएम व निवडणूक प्रक्रियेविषयी अनुभव कथन, विचारवंतांचे ईव्हिएम व निवडणूक फसवणुकीच्या कारणांचे सामाजिक, आर्थिक व राजकीय विशेषण, तंत्रज्ञांकडून ईव्हिएम व निवडणक घोटाळ्यांची तपशीलवार मांडणी, ईव्हिएम हॅकिंगचे प्रात्यक्षिक आदी विषयांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.











