न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिका पदाधिकारी व आरोग्य अधिकाऱ्यांनी गुरुवार (दि. ११) रोजी घरोघरी कचरा संकलन करणे व वाहतूक करणे या कामासंदर्भात नव्याने नियुक्त केलेल्या ठेकेदारांच्या कामाची पाहणी केली.
या दरम्यान शहरातील रावेत, वाकड, डांगे चौक, पिंपळे निळख, विकासनगर किवळे, पिंपळे गुरव, सांगवी इत्यादी परिसरात सदरील कामाची पाहणी दौरा करण्यात आला. ज्या-ज्या ठिकाणी काही प्रमाणात कचरा वाहतूक करणे व संकलन करणार या कामात त्या त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं कार्यवाही करण्याचे आदेश या वेळी देण्यात आले.
या पाहणी दौऱ्या दरम्यान सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, अतिरीक्त आयुक्त संतोष पाटील, मुख्य आरोग्य अधिकारी अनिल रॉय, आरोग्य अधिकारी गोफने आदी उपस्थित होते.












