न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०१९) :- शहरातील नागरिकांना नाहक त्रास होणा-या समस्यांवर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी व नगरसदस्या, नगरसदस्य यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करुन त्यांच्या प्रभागातील कामे त्वरीत पूर्ण करावीत अशा सूचना महापौर राहूल जाधव यांनी अधिका-यांना दिल्या.
प्रभाग स्तरावरील अडचणी व विकास कामांबाबतच्या आढावा बैठकांचे आयोजन सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये त्यांनी केले असून आज “फ” प्रभागाची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला“फ” प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, नगरसदस्य कुंदन गायकवाड, संजय नेवाळे, प्रविण भालेकर, उत्तम केंदळे, नगरसदस्या संगिता ताम्हाणे, कमल घोलप, सुमन पवळे, स्वीनल म्हेत्रे, प्रभागाचे नामनिर्देशित सदस्य दिनेश यादव, संतोष मोरे, पांडूरंग भालेकर, सहाय्यक आयुक्त मनोज
लोणकर, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुके, कार्यकारी अभियंता प्रविण लडकत, प्रदिप पुजारी, प्रविण घोडे, उपअभियंता प्रकाश सळवी, सुनिल शिंदे, पशुवैदयकीय अधिकारी डॉ.अरुण दगडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी धाकोजी शिंदे, गणेश देशपांडे, आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महापौर राहुल जाधव यांनी नगरसदस्यांचे सूचनेनुसार वृक्षारोपन करणे, कचरा वेळच्यावेळी उचलणे, कचरावाहतूक गाड्यांची संख्या वाढवून फे-या वाढविणे, कचरा उचलण्यासाठी क्षमतापूरक कचरा गाड्या ठेवणे, समान पाणीपुरवठा करणे, रस्त्यावर पडलेले खडडे भरणे, मोकाट कुत्रे व डुकरे यांना पकडून कार्यवाही करणे, प्लास्टीकच्या पिशवित अन्न किंवा कचरा न टाकणे बाबत जनजागृती करणे, रहदारीस अडथळा असणारे अतिक्रमण त्वरीत काढणे या बाबतच्या सुचना त्यांनी दिल्या











