न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरात विशेषत: पावसाळ्यात पडणारे खड्डे दुरूस्त करणेकामी व परिसर साफ सफाईकामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कटीबद्ध आहे. नागरीकांची असुविधा दूर व्हावी व त्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कमीत कमी वेळेत उचीत कार्यवाही व्हावी यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिकांना सहकार्याचे आवाहन करीत आहे.
तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपण वास्तव्यास असलेल्या भागात पावसाळ्यात खड्डे पडल्यास किंवा रस्ता खराब झाल्यास तसेच परिसर स्वच्छतेसाठी, अशा ठिकाणचे फोटो व संपुर्ण पत्ता इ.माहितीसह मनपाचा whatsapp नंबर ९९२२५०१४५० या नंबरवर पाठविणेत यावे. नागरिकांच्या समस्याचे तातडीने निराकरण व्हावे यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तसेच सदर बाबतची तक्रार सारथी हेल्पलाईन नंबर ८८८८००६६६६ या दुरध्वनीवर नोंदविणेची सुविधा देखील उपलब्ध आहे, अशी माहिती नागरी सुविधा केंद्राचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ धों. पोमण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.











