न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ ऑगस्ट २०१९) :- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निगडी भक्ती-शक्ती चौकातील आण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सेवादलाचे राष्ट्रीय सचिव संग्राम तावडे, युवक कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस मयूर जैसवाल, भाऊसाहेब अडागळे, बाबा बनसोडे, हिरामण खवळे, सुंदर कांबळे, लक्ष्मण रुपनर, परशूराम गुंजाळ, विशाल कसबे, संदेश बोर्डे, किशोर कळसकर, गौरव चौधरी, दीपक जाधव, आशा शहाणे, शीतल कोतवाल, रमजान अत्तार आदी उपस्थित होते.















