न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ ऑगस्ट २०१९) :- निगडी परिसरात पहाटे तीनच्या सुमारास घरातील सर्वजण गाढ झोपेत असताना बूटचोर घराची पाहणी करतो. घराच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून हा चोर आतमध्ये येतो. चप्पल स्टॅन्डजवळ जाऊन बाहेरच्या परिस्थितीचा आढावा घेतो. त्यानंतर चप्पल स्टॅन्डजवळ बसून एक एक बूट त्याच्याजवळ असलेल्या पोत्यात भरतो. पोत्यात भरत असलेला प्रत्येक बूट नामांकित कंपनीचा ब्रँडेड आहे का? हे तो चोर पाहतो.
चोरत असलेला बूट महागडा असल्याची खात्री झाली तरच तो चोरतो. जुन्या चपला, बूट तो अजिबात चोरत नाही. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. एका ब्रँडेड बुटाची किंमत साधारणतः चार ते पाच हजार रुपये आहे.
याबाबत निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे म्हणाले, ‘बूट चोराची तक्रार निगडी पोलिसांकडे आली आहे. मागील काही दिवसांपासून त्यावर कारवाई करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. परिसरात रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे. पहाटेच्या वेळी हे प्रकार होत असल्याचे त्या अनुषंगाने पोलीस प्रयत्न करीत आहेत. लवकरच चोरटा पोलिसांच्या जाळ्यात येईल.















