न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ ऑगस्ट २०१९) :- रेडझोनबाधीत भूखंडावरील बांधकामासाठी कोणत्याही सार्वजनिक सोयी सुविधा न पुरविणेबाबत दिलेला आदेश रद्द करावा, अशी मागणी नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील संरक्षण विभागाच्या रेडझोनमधील बांधकामांना सोयी-सुविधा देण्यात येऊ नयेत. यापूर्वी अनधिकृतरित्या घेतलेल्या सोयी-सुविधा तत्काळ खंडीत करण्यात यावेत, असा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. हा आदेश त्वरित रद्द करण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
रेडझोन हद्दीतील पूर्वी विकसीत झालेल्या मिळकतींना सर्व मूलभूत सुविधा देता येतील असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. यावेळी तात्या भालेकर व रेडझोन समिती सदस्य नरेंद्र भालेकर उपस्थित होते.















