- मात्र, दत्ता साने घेणार माघार; लांडे यांना देणार पाठींबा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ ऑक्टोबर २०१९) :- भोसरी विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार विलास लांडे यांनी आज राष्ट्रवादी कॉग्रेस पुरस्कृत अपक्ष तर माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने दत्ता साने यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माञ भोसरीतील पेच आता सुटला असून आता विलास लांडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार घोषित करण्यात आले आहे.
दरम्यान अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले दत्ता साने हे त्यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीपर्यंत आपला अर्ज माघार घेवून विलास लांडे यांना पाठिंबा देणार आहेत.











