न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०१९) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत तसेच वंचित बहुजन आघाडी पार्टी वतीने पुरस्कृत करण्यात आलेले अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी आपल्या प्रचार दौऱ्यादरम्यान वाकडच्या समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळींची बैठक आयोजित केली.
या बैठकीमध्ये चिंचवड विधानसभेसाठी समस्त गावकरी ग्रामस्थांनी एकजुटीने पाठींबा देऊन विक्रमी मताधिक्याने परिवर्तन घडविण्याचा निर्धार व्यक्त केला. वाकडच्या सर्व ग्रामस्थांनी घेतलेला हा निर्णय राहुल कलाटे यांच्या प्रचारात अधिकाधिक भर पाडत असल्याने राहुल कलाटे चिंचवड विधानसभा मतदारसंघात ग्रामस्थांच्या पाठिंब्यावर महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना चुरशीची लढत देणार असल्याचे सांगितले जात आहे.
यावेळी राहुल काटे यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले. तसेच चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आपला विकासाचा अजेडा ग्रामस्थांना समोर ठेवून चिंचवड विधानसभा मतदारसंघ कसा विकसनशील होईल याबाबतही चर्चा केली.















