- खुद्द मुख्यमंत्रीही दादांच्या पाठीराख्यांचे समर्थन पाहून अवाक!
- युवा नेते पांडाभाऊ सानेंनी व्यक्त केला विश्वास
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०१९) :- आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गुरुवारी भोसरी मतदारसंघात दौरा होता. या दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार महेशदादा लांडगे यांच्यावतीने आयोजित ‘रोड शो’ मध्ये नेतृत्व केले. या रोड शो मध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधला. तसेच, आमदार लांडगे यांनाच प्रचंड मताधिक्क्याने विजयी करा, असं जनतेला आवाहन केलं.
याबाबत न्यूज पीसीएमसी शी बोलताना युवा नेते पांडाभाऊ साने म्हणाले की, आमदार लांडगे यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघ स्मार्ट बनविण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली. दादांनी पाच वर्षात मतदारसंघातील अनेक प्रलंबित कामे मार्गी लावली. रस्त्यांची असोत की मुलभूत समस्या असोत त्या मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारकडून मोठा निधी आणला. महापालिकेत समाविष्ट भागातील अनेक धडपड्या युवकांना नेतृत्वाची संधी दिली. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातूनही हा मतदारसंघ स्मार्ट बनविण्यासाठी दादांचे मोठे योगदान आहे.
त्या योगदानामुळेच संपूर्ण मतदारसंघ कालच्या रोड शो मध्ये दादांना पाठींबा देण्यासाठी सहभागी झाला होता. खुद्द मुख्यमंत्रीही दादांच्या पाठीराख्यांचे समर्थन पाहून अवाक झाले होते. दादा एक लाखांच्या मताधिक्याने विजयी होणारच, हा संदेश देण्यासाठीच भोसरी मतदारसंघातील जनतां कालच्या जन यात्रेत सहभागी झाली होती, असा विश्वास साने यांनी बोलताना व्यक्त केला.















