- आ. जगताप यांच्या प्रचार सभेत पंकजा मुंडेंची राष्ट्रवादीवर टीका
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०१९) :- राष्ट्रवादीच्या घड्याळात दहा वाजून दहा मिनिटं असतात. या वेळेला हे घड्याळ कायमचंच बंद करून टाकायचं आहे, असे आवाहन भाजपा मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केले.
त्या पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत बोलत होत्या. यावेळी खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधवसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
मुंढे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात काँग्रेसमुक्त देश तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी मुक्त करण्याचा निर्धार केला असून त्या शिवाय राजकारण स्वच्छ होणार नाही. अहंकार, अतिविश्वास हा राष्ट्रवादीच्या लोकांना आहे, सत्ता म्हणजे आमची मक्तेदारी आहे ती कोणीही मिळवू शकत नाही, अस म्हणत पंकजा मुंडे राष्ट्रवादीचा खरपूस समाचार घेतला. राष्ट्रवादी ने सिद्ध केल की, ते निवडणूक हरलेले आहेत. ज्या ठिकाणी हजारो लोक बसले आहेत. तिथे एक व्यक्ती उभा करून बोलवण्याचे हे त्यांचे धंदे जुने आहेत. हे जनता खपवून घेणार नाही.












