न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०१९) :- विकसन करारनामा झालेला असताना बनावट विकसन करारनामा तयार करून बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटी रुपयांची फसवणूक केली. तसेच बांधकाम साइटवर असलेले सिमेंट आणि स्टील स्वतःच्या फायद्यासाठी वापरले, असल्याची फिर्यादी भोसरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. हा प्रकार भोसरी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात झाला आहे.
विजय वामन येळवंडे यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली त्यानुसार आतिश मोहन भालसिंग, ओम प्रकाश भाटिया ,मलेश श्यामलाल बठीजा , गिरीधर अंकुशराव गायकवाड, सागर भिमराव परामणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विजय रियल इस्टेट आणि ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात. २०१२ सन त्यांनी गोधन प्रॉपर्टीज नावाने फॉर्म स्थापन केली. त्या फर्ममध्ये आरोपी कमलेश गिरिधर आणि सागर भागीदार होते विजय यांनी आरोपी ओमप्रकाश यांच्याकडून रावेत येथील सुमारे पाच गुंठे जमिनीचे कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र करून घेतले.
विजय आणि ओमप्रकाश यांच्यामध्ये विकसन करारनामा झालेला असताना आरोपींनी पुन्हा दुसरा बनावट विकसन करारनामा व कुलमुखत्यारपत्र केले तसेच आरोपी आतिश यांनी विजय यांच्यासोबत भाडे करार झालेला असताना विजय यांच्या परस्पर दुसऱ्या इसमासोबत भाडे करार केला. गोधन प्रॉपर्टीज मध्ये बेकायदेशीररीत्या भाडेकर ठेवून विजय यांना जीवे मारण्याची धमकी दिली आरोपींनी विजय यांची सुमारे दोन कोटी ५० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली तसेच चार लाख ५० हजार रुपयांचे सिमेंट स्टील मटेरियल आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरून त्याचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.















