न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०१९) :- शहरातील पिंपरी-चिंचवड-भोसरी मतदारसंघातील मतमोजणी उद्या होणार आहे. पिंपरी, भोसरी मतदारसंघाची २० आणि चिंचवडची २२ टेबलांवरुन मतमोजणी होणार आहे.
प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी असणार आहेत. तीनही मतदारसंघातील मतमोजणी कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात आले. साधारणतः पिंपरी आणि भोसरीचा निकाल दुपारी एक तर ‘चिंचवड’चा निकाल दुपारी तीन वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.
२० ते २२ फेऱ्यांमध्ये निकाल हाती येणार असून टपाली मतमोजणीनंतर ‘ईव्हीएम’वरील मतमोजणी सुरू होईल. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.















