न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑक्टोबर २०१९) :- पिंपरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे यांचा १९ हजार ६१८ मतांनी विजय झाला आहे. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार अॅड. गौतम चाबुकस्वार यांना पराभवाची धूळ चारत मागील पराभवाचे उट्टे काढत पुन्हा राष्ट्रवादी कॉग्रेसचा पिंपरीत बालेकिल्ला शाबूत ठेवला.
पिंपरीत राष्ट्रवादीचे नगरसेवक आण्णा बनसोडे यांना शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांनी झुंजवत ठेवले होते. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने आघाडी न घेतल्यामुळे आण्णा बनसोडे यांचा विजयाचा मार्ग सोपा झाला.
मतमोजणीच्या एकूण २० फे-या झाल्या. विसाव्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना ८६ हजार १८४ मते मिळाली. तर अॅड. गौतम चाबुकस्वार यांना ६६ हजार ५७६ मते मिळाली. पोस्टल मतदानामध्ये अण्णा बनसोडे यांना ११२ तर चाबुकस्वार यांना २०० मते मिळाली.
पहिल्या सहा फे-यांमध्ये महायुतीचे उमेदवार अॅड. गौतम चाबुकस्वार आघाडीवर होते. अचानक सातव्या फेरीनंतर अण्णा बनसोडे यांचे मताधिक्य वाढले. सातव्या फेरीत अण्णा बनसोडे यांनी ७६५ मतांनी आघाडी घेतली. ही आघाडी बनसोडे यांनी कायम ठेवली. मतमोजणीच्या एकूण वीस फे-या झाल्या. शेवटच्या फेरीत बनसोडे यांना ८६ हजार १८४ मते मिळाली. तर अॅड. गौतम चाबुकस्वार यांना ६६ हजार ५७६ मते मिळाली.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बाळासाहेब गायकवाड १३ हजार ६८१ मते घेऊन तिसऱ्या स्थानावर राहिले. तर, भाजपचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब ओव्हाळ यांना ९३५ इतकी मते मिळाली. तर, ३२४० इतकी मते ‘नोटा’ अर्थात ‘वरीलपैकी कोणाही नाही’ला मिळाली आहेत.















