- आमदार महेश लांडगे यांनी मानले जनतेचे आभार!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑक्टोबर २०१९) :- आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी विकासाच्या अजेंड्यावर मतदान केले आहे.
आम्ही दूरदृष्टी ठेऊन मागील पाच वर्षात काम केले आहे. दिलेल्या कमिटमेंटनुसार काम केले असून पुढील कालावधीचे देखील व्हिजन ठरवण्यात आले आहे. त्यानुसार पुढील काम चालू राहणार आहे. वाढते शहरीकरण आणि भेडसावणाऱ्या समस्या ओळखून त्यावर काम सुरू आहे.
जनतेने विकासाच्या अजेंड्यावर मतदान केले आहे. त्याबद्दल सर्व जनतेचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया महेश लांडगे यांनी विजयी झाल्यानंतर केली.















