- मंत्रीपद दिले तर आनंदच होईल; आ. जगतापांची प्रतिक्रिया
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑक्टोबर २०१९) :- भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि मला दोघांनाही मंत्री केले. तर, आनंदच आहे. तसेच मंत्री नाही केले तरी दु:ख होणार नाही. आम्ही राजकारणाबरोबरच समाजकारणपण करतो.
त्यामुळे काम करण्यासाठी मंत्री होणे गरजेचे नाही. आमदार म्हणूनही चांगले काम करता येते. मंत्री म्हणून राज्यभर काम करण्यापेक्षा आमदार म्हणून शहरात काम करता येते, अशी प्रतिक्रीया भाजपचे शहराध्यक्ष नवनिर्वाचित आमदार लक्ष्मण जगताप यांनी विजयोत्सवानंतर दिली.














