न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑक्टोबर २०१९) :- दिवाळी हा दिव्यांचा उत्सव. या उत्सवात लहानापासून ते मोठयांपर्यंत सर्वचजण आनंदाने सहभागी होतात. देशभरात सर्वत्र हा सण उत्सवात साजरा होतो. दरवर्षी शहरातील दिव्यांग बांधवांनाही या उत्सवात सहभागी करत ‘साद सोशल फौंडेशन’ च्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे शिवसेना कामगार नेते व शिवसेना खेड-भोसरी विधानसभा सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद यावेळी म्हणाले.
साद सोशल फौंडेशनच्या वतीने बुधवारी (दि. २३) रोजी आकुर्डीतील खंडोबा मंदीर सांस्कृतिक हॉल या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरातील अंध-दिव्यांग बांधवांच्या कुटुंबीयांना “दिवाळी फराळ वाटप” या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी इरफान सय्यद बोलत होते. या कार्यक्रमास शिवसेना कामगार नेते व शिवसेना खेड-भोसरी विधानसभा सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद, निगडी पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, साद सोशल फौंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. महेश शेटे, जनरल सेक्रेटरी प्रविण जाधव, कार्याध्यक्ष परेश मोरे, संघटक राहुल कोल्हटकर, उद्योजक भीमसेन अगरवाल, अरविंद सोळंकी, युवा नेते किसन बावकर, निरंजन शेटे, भारत सरकार वित्त मंत्रालय सल्लागार अशोककुमार पगारिया, मातोश्री पतसंस्थेचे संचालक पांडुरंग कदम, पोलीस निरीक्षक शाकीर जेनेडी, उदयोजक संजय सोळंकी, पुणे जिल्हा शिवसेना उपप्रमुख निलेश मुटके, स्टार रोडलाईन्सचे हसनभाई तसेच सर्व दिव्यांग बांधव व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इरफान सय्यद पुढे बोलताना म्हणाले की, या माध्यमातून समाजातील दिव्यांग व त्यांच्या कुटुंबियांना एक आधार देण्याचा प्रयत्न साद च्या माध्यमातून दरवर्षी केला जातो. दिव्यांग बांधवाना सामाजिक उपक्रमात सहभागी करीत त्यांच्यात समाजात वावरण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही या उपक्रमाच्या माध्यमातून करीत आहोत. तसेच संघटनेच्या माध्यमातूनही दिव्यांग बांधवांच्या सामाजिक, प्रशासकीय व दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
यावेळी ‘साद सोशल फौंडेशन’ च्या वतीने दिव्यांग बांधवाना दिवाळी फराळाचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास दिव्यांग बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सचिव प्रविण जाधव यांनी मानले.
साद फौंडेशन च्या वतीने दिव्यांग बांधवाना “दिवाळी फराळ वाटप”
















