- उद्या रविवारी शहरात विविध ठिकाणी छट पुजेचे भव्य आयोजन – विजयकुमार गुप्ता
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ नोव्हेंबर २०१९) :- चिंचवडगावातील पवना नदीच्या घाटावर आज शनिवारी (दि. २) रोजी हनुमान मित्र मंडळाच्या वतीने विजयकुमार गुप्ता व जयप्रकाश नारायणप्रसाद गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली छट उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी पवना नदी घाटावर भव्य गंगा आरती, पूजा, भजन, छट लोकगीत विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्तर भारतीय भाविक मोठ्या भक्ती भावाने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे उत्तर भारतीय समाज बांधवाना छट पूजेच्या शुभेच्छ्या देताना म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात नोकरी, उद्योग, व्यवसायानिमित्त बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश येथून वास्तव्यास आलेले समाजबांधव एकत्र येवून शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात छट उत्सव साजरा करतात. या समाजबांधवांच्या कुटूंबांना सुख, समृध्दी, आरोग्य, ऐश्वर्य लाभावे याच माझ्या सदिच्छा.
यावेळी खा. श्रीरंग बारणे, शिवसेना जिल्हाप्रमुख गजाजन चिंचवडे, सामाजिक कार्यकर्ते खंडूशेठ चिंचवडे, छट उत्सव समितीचे विजयकुमार गुप्ता व आदी उपस्थित होते.
उद्या रविवारी (दि. ३) रोजी पहाटे ३.०० वाजेपासून ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत छट उत्सव सुरु राहणार असून, या उत्सवात उत्तर भारतीय समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विजयकुमार गुप्ता यांनी भाविकांना यावेळी केले.
















