न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ नोव्हेंबर २०१९) :- सततच्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. त्यामुळे खड्ड्यांची डागडुजी होणे अत्यंत आवश्यक आहे.
शहरातील काळेवाडी-पिंपरी रस्त्यालगत, काळेवाडी पोलीस चौकीसमोरील महापालिकेच्या रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. या मार्गावर वाहतुकीची प्रचंड वर्दळ असते.
वाहनचालकांना हा खड्डा चुकविताना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसातही या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून अपघातास निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे महापालिकेने हा खड्डा त्वरीत बुजविण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे.












