न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिका पवना धरणातून दिवसाला ४८० एमएलडी तर, एमआयडीसीकडून ३० एमएलडी असे ५१० एमएलडी पाणी उचलते. दररोज पाणीपुरवठा केल्यास जास्त दाबाने पाणीपुरवठा करता येत नाही.
पाण्याचे वितरण व्यवस्थित करण्यासाठी पाणीकपात करावी लागते. त्यामुळे विभागनिहाय आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यात येणारा पाणीपुरवठा मागे घेणार नाही, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.
पवना धरणात १०० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे विरोधकांकडून पाणीकपात मागे घेण्याची मागणी केली जात होती. त्यापार्श्वभूमीवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला.















