न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०१९) :- एक वर्षाच्या मुलीची एक्सरे तपासणी करत असताना एक्सरे मशीन फुटली. या घटनेत चिमुकली भाजली. ही घटना न्यूक्लिअस डायग्नोस्टिक सेंटर, पिंपरी येथे घडली. याप्रकरणी डायग्नोस्टिक सेंटरचे व्यवस्थापक, डॉक्टर आणि टेक्निशियन अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यवस्थापक गिरीश मोटे, डॉ. सुयोग सोमकुंवर, डॉ. रवींद्र फुलारी, टेक्निशियन अक्षय पाटील, टेक्निशियन अपूर्वा कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शार्वी भूषण देशमुख (वय १) असे जखमी चिमुकलीचे नाव आहे. प्रियांका भूषण देशमुख (वय ३१, रा. चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.















