न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०१९) :- डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, नेत्र सेवा प्रतिष्ठान तसेच लायन्स क्लब पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालय, पिंपरी येथे मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ५६ रूग्णांवर तिरळेपणा घालविण्यासाठी मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.
शिबिराचे व परिषदेचे उदघाटन कुलगुरू डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, व डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालयाचे कुलगुरु डॉ. एन. जे. पवा , रुग्णालय व संशोधन केंद्राचे प्राचार्य डॉ. गुणवंत येवला, उपप्राचार्य डॉ. प्रशांत खाडे, विभाग प्रमुख शालाक्यतंत्र व आयोजक सचिव डॉ. नीलिमा अमृते तसेच डॉ. मधुसूदन झंवर, डॉ. पारस शहा, ओमप्रकाश पेठे उपस्थित होते.
दि. १० नोव्हेंबर २०१९ रोजी शस्त्रक्रिया शिबिर व परिषदेचा समारोप करण्यात आला. संस्थेचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, ट्रस्टी डॉ. स्मिता जाधव यांनी अशा स्वरूपाच्या समाजउपयोगी उपक्रमांचा व डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयातील सोयी सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. शालाक्य विभागाचे डॉ. नीलिमा अमृते, डॉ. पल्लवी जगताप, डॉ. संतोष राहिंज, डॉ. आनंद काळे, डॉ. अभिजीत घाडगे, प्राचार्य डॉ. गणवंत येवला, उपप्राचार्य डॉ. प्रशांत खाडे, सल्लागार डॉ. बी. पी. पांडे, उप-अधीक्षक डॉ. पृथ्वीराज उगळे व अमोल पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.















