न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हेंबर २०१९) :- उन्नती सोशल फौंडेशन, पिंपळे सौदागर च्या वतीने अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालय ,पिंपळे सौदागर येथे बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व मुलांचे डोळे व दात तपासणी मोफत शिबीर राबविण्यात आले. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी उन्नती सोशल फाऊंडेशन, क्लोव डेन्टल व ध्रुव ऑप्टीक्स यांच्या सयुंक्त विद्यमाने मोफत डोळे व दात तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
“मुले हि देवाघरची फुले असतात त्यांची काळजी घेणे आणि त्यांना उज्वल भविष्याची वाटचाल दाखविणे हे आपले कर्तव्य आहे असे मत समारोपप्रसंगी उन्नति सोशल फाऊंडेशन चे संस्थापक संजय भिसे यांनी केले. तर अध्यक्षा कुंदा भिसे यांनी यापुढेही अश्या प्रकारची शिबीर आणि मुलांना भविष्याच्या दृष्टीने ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सर्व गोष्टी उन्नती सोशल फाऊंडेशन मार्फत करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले. यावेळी अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनिता ईस्कांडे यांनी “उन्नती सोशल फाऊंडेशन शाळेसाठी देत असलेले योगदान हे अतुलनीय असल्याचे मत व्यक्त केले “.
यावेळी क्लोव डेन्टल च्या डाँ. रुपाली आठवले, डाँ. मिनू डोईफोडे, ध्रुव आँप्टिक्सचे दीपक व्होरा , कविता वाझ,अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक अलका कांबळे, शुभदा ताटे, वर्षा हडपसरकर, भगत मँडम, नरेश पाटील , खैरेसर,महेश गवस इत्यादी मान्यवर उपस्थित होते. दिवसभर चाललेल्या शिबिरात डोळे आणि दातांची तपासणी करण्यात आली. डॉक्टरांनी तपासणीसोबतच दातांची आणि डोळ्यांची निगा कशी राखावी याबाबत विद्दार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय न्यायाधीश यांनी केले तर आभार सहशिक्षिका वर्षा हडपसरकर यांनी मानले.