न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हेंबर २०१९) :- रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन आणि एलआयसी निगडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए स्कुलमध्ये बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. तसेच ‘स्टुडंड ऑफ द इयर’ या पुरस्काराने विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
पिंपरीतील एच.स्कुलमध्ये गुरुवारी (दि. १४) झालेल्या या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष बाळासाहेब उ-हे, एलआयसी निगडी शाखेच्या वरिष्ठ व्यवस्थापिका वीणा अकोलकर, सहाय्यक व्यवस्थापक मिलिंद जोशी, विकासाधिकारी श्रीकांत घोडके, मनीषा कुरळे, रोटरीचे सचिव सारंग माताडे, खजिनदार आनंद सूर्यवंशी, शिक्षक गाढवे सर, डाके सर आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी आकर्षक चित्रे काढली होती. चित्रकला स्पर्धेतील विविध गटातील 25 विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. तसेच ‘स्टुडंड ऑफ द इयर’ या पुरस्काराने विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.