न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमधील अनधिकृत बांधकामे, बिगरनोंद, वाढीव मालमत्तांची कर संकलन विभागाच्या वतीने पाहणी करण्यात येणार आहे. मालमत्ताधारकांनी थकबाकीसह मिळकतकराचा भरणा करण्याचे आवाहन करसंकलन विभागाने केले आहे.
महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामे अधिकृत होतील. शास्तीकर माफ होईल, या उद्देशाने मालमत्ता कर न भरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावर उपायोजना करण्याबरोबरच महापालिकेकडे जास्तीत जास्त कर संकलन करण्याच्या उद्देशाने करसंकलन विभाग मोहीम राबविणार आहे. त्यामुळे नागरिकांनी थकबाकीसह मिळकतकराचा भरणा करण्याचे आवाहन करसंकलन विभागाने केले आहे.















