न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०१९) :- कुख्यात कुंड महाकाली याचा सख्खा भाऊ आणि आणखी एका आरोपीला देहूरोड पोलिसांनी दोन वर्षांकरिता पुणे जिल्ह्यातून तडीपार केलं आहे.
मनोज उर्फ डिंगऱ्या फुलचंद ढकोलिया आणि जोयेल भास्कर पिलाणी अशी तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मनोज उर्फ डिंगऱ्या फुलचंद ढकोलिया हा कुख्यात गुंड महाकालिचा भाऊ आहे. दोघांवर ही गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोघेही देहूरोड पोलीस ठाण्यातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.


















