न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेची ऑक्टोबर महिन्याची तहकूब सभा व नोव्हेंबर महिन्यातील नियोजित सभा आज बुधवारी (दि. २०) रोजी पार पडली. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
पिंपरी-चिंचवड शहरातील नैसर्गिक नदी, नाले, ओढे इत्यादी जलस्त्रोतांच्या बाजूने पदपथ, मोकळ्या आणि अडगळीच्या जागी टाकाऊ बांधकाम साहित्य टाकल्यास आता महापालिका फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे.
तसेच संबंधितांकडून दहापट दंडाची रक्कम वसूल केली जाणार आहे. याबाबतच्या धोरणाला आज (बुधवारी) झालेल्या महासभेत मान्यता देण्यात आली.


















