न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हेंबर २०१९) :- दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज गुरुवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. मयूर मधुकर वाघ (२६) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेचा अधिक तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “गुरुवारी सकाळी मोशी येथील नक्षत्र सोसायटीमधून मयूर वाघ नावाचा तरुण इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झाला असल्याचा फोन आला. त्याला तातडीने जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. दरम्यान, ही आत्महत्या होती की, अपघात याचा पोलीस तपास करत आहेत.


















