- स्वी नगरसेवक दिनेश यादव यांची आयुक्तांकडे मागणी….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हेंबर २०१९) :- चिखली पाटीलनगर या भागात वनीकरण आहे. या ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेने चालण्यासाठी, व्यायामा साठी ट्रॅक बनविला आहे. परंतु, सविधांचा अभाव आहे. याबाबत महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांना या परिसरात सुविधा पुरविण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
यात त्यांनी सुरक्षा रक्षक नेमणूक, स्वच्छतागृहाची बांधणी, कचरा पेटीची व्यवस्था, लाईट पोल बसविणे, मातीचा ट्रॅक बनविणे, झाडांसाठी पाण्याची व्यवस्था करणे, झाडे तोडू नये म्हणून फलक लावणे, झाडांना आळे करणे, ट्रॅकला पूर्ण कंपाऊंड करणे आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून सर्वसंपन्न ट्रॅकची निर्मिती होईल, असे या निवेदनात यादव यांनी म्हटले आहे.















