- चिखलीतील जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी, रावेत, पुनावळे, ताथवडे या परिसरातील टीपी स्कीम उपसूचनेद्वारे रद्द
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हेंबर २०१९) :- प्रभाग दोनमधील जाधववाडी, चिखलीतील टीपी स्कीम उपसूचनेद्वारे वगळणार? आ. लांडगे, महापौर जाधव व आयुक्तांमध्ये टीपी स्कीम वगळण्याबाबत सकारात्मक चर्चा ? या मथळ्याखाली न्यूज पीसीएमसी ने (दि. १४ नोव्हेंबर २०१९) रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते.
ते तंतोतंत खरे ठरले असून, पिंपरी महापलिकेच्या बुधवारी (दि. २१) रोजीच्या सर्व साधरणसभेत महापौर राहुल जाधव यांनी प्रभाग दोन चिखलीतील जाधववाडी तसेच बोऱ्हाडेवाडी यासह रावेत, पुनावळे, ताथवडे या परिसरातील टीपी स्कीम उपसूचनेद्वारे रद्द केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने समाविष्ट गावांतील बारा भागांमध्ये नगर नियोजन (टीपी) स्किमनुसार विकास करण्याचे नियोजित होते. मात्र, प्रभाग क्रमांक दोनमधील चिखली-जाधववाडी, तसेच बोऱ्हाडेवाडी, रावेत, पुनावळे, ताथवडे या परिसरातील नागरिकांनी टीपी स्कीम राबविण्यास विरोध दर्शविला. तसेच या परिसरातील बहुतांश भागात विकासाची कामे आधीच झाली आहेत, अशी कारणे देत महापालिकेकडून या गावांना टीपी स्कीममधून वगळण्यात आले आहे. त्यावर कालच्या सभेत महापौर राहुल जाधव यांनी शिक्कामोर्तब केले.















