न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हेंबर २०१९) :- आई-वडिलांच्या सांगण्यावरून पत्नीचा खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मंगळवारी महिलेच्या घरी तिचा मृतदेह संशयस्पदरित्या आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी तिचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला होता.
मृत्यू झालेल्या महिलेच्या आईने भोसरी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार पती योगेश देसाईला अटक करण्यात आली आहे. तसंच त्या महिलेची सासू विमल देसाई, सासरे इराण्णा देसाई यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारिका देसाई असे सदर महिलेचे नाव असून सारिका आणि तिचा पती दोघे भोसरी येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.


















