न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिनानिमित्त संविधान जनजागृतीपर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परीसर, पिंपरी येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवार दि. २६ नोव्हेंबर २०१९ रोजी सायं. ०६.०० वाजता मा. महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, खासदार अमर साबळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. खासदार श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार अण्णा बनसोडे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, विरोधी पक्षनेता विठ्ठल ऊर्फ नाना काटे, आयुक्त श्रावण हर्डीकर, विधी समिती सभापती अश्विनी बोबडे, शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास उर्फ बाबा बारणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, क प्रभाग अध्यक्षा यशोदा बोईनवाड, ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, इ प्रभाग अध्यक्षा सुवर्णा बुर्डे, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, ग प्रभाग अध्यक्षा अर्चना बारणे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या गीता मंचरकर, डॉ. वैशाली घोडेकर (लोंढे), नगरसदस्य राहूल भोसले, समीर मासुळकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार यांच्यासह सर्व सन्माननीय नगरसदस्य व नगरसदस्या उपस्थित राहणार आहेत.
मंगळवार दि. २६/११/२०१९ रोजी सकाळी १०.०० वाजता महापालिका मुख्य कार्यालयात संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येईल. सायं. ४.०० वाजता स्वप्नील पवार, शेखर गायकवाड व अशोक निकाळजे यांचा प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे. सायंकाळी ६.०० वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन व संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन व व्याख्याते दत्ता देसाई यांचे भारतीय संविधान विश्वात महान या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर रात्री ७.०० वाजता सुप्रसिध्द पार्श्वगायिका रेश्मा सोनावणे, पार्श्वगायक रोमियो कांबळे, राखी चौरे व आकाश कांबळे यांच्या देशाची शान भारताचे संविधान या संविधान जनजागृतीपर भव्य प्रबोधनात्मक कार्यक्रमाने सांगता होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.












