न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 24 नोव्हेंबर 2019 :- पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट गावांचा समावेश होऊन आज कित्येक वर्षे लोटली तरी, या भागातील समस्या सुटण्यास तयार नाहीत. विकासाच्या बाबतीत महापालिकेचे नेहमीच या भागाकडे दुर्लक्ष होते. चिखलीतील कुदळवाडी परिसरातही तिच परिस्थिती. याबाबत महापलिकेच्या ” फ ” क्षेत्रिय कार्यालयाचे स्विकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी महापालिका आयुक्त श्रावण हार्डिकर यांना कुदळवाडी परिसरात नवीन स्ट्रीट लाईट पोल व दिवे बसविण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्र. २ व ११ कुदळवाडी परिसर येथे जुने पोल मोडकळीस आले आहेत. तसेच काही ठिकाणी अद्याप पोल बसविलेले नाहीत.
कुदळवाडी परिसरातील विठ्ठल मंदिर, मोरे पाटील चौक, इंद्रायणी वजन काटा, जय गणेश वजन काटा, बालघरे वस्ती चौक, नवज्योत मित्र मंडळ, गुरुकृपा मंडळ चौक, पात्रे आळी, महादेव मंदिर चौक, महादेव नगर, आदेश पेट्रोल पंपासमोरील भाग, कुदळवाडी, हरगुडे वस्ती चौक या भागात नवीन हायमस्ट दिवे बसवावेत. त्यासाठीची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी, असे या निवेदनात यादव यांनी म्हटले आहे.












