न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे यांच्या स्मृती दिनानिमित्त महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी रविवारी (दि. २५) रोजी निगडी चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस उपमहापौर तुषार हिंगे व नगरसदस्या सुमनताई पवळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
निगडी चौकात झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर तुषार हिंगे, नगरसदस्या सुमन पवळे, शारदा सोनवणे, माजी नगरसदस्या उमा खापरे, जनता संपर्क अधिकारी रमेश भोसले, माहिती व जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
तसेच आज सोमवारी (दि. २५) रोजी भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त महापालिका भवनातील त्यांच्या प्रतिमेस तसेच वल्लभनगर बसस्थानकाजवळील व कै.यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील त्यांच्या पुतळ्यास महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

आज सकाळी मनपा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमास सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, जैव विविधता व
व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंढे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील नगरसदस्या अनुराधा गोरखे, नगरसदस्य संतोष कांबळे, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी राजेश आगळे, वामन मेमाणे, जनता संपर्क अधिकारी रमेश भोसले आदी उपस्थित होते.
तसेच वल्लभनगर व कै.यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात झालेल्या कार्यक्रमास सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास
मडिगेरी, जैव विविधता व व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंढे, नगरसदस्य संतोष कांबळे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कै.यशवंतराव चव्हाण
स्मृती रुग्णालयाचे डॉ.मनोज देशमुख आदी उपस्थित होते.












