न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी महापालिकेच्या मुख्य प्रशासकिय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस व पिंपरी येथील त्यांच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकिय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, नगरसदस्या अनुराधा गोरखे, नगरसदस्य संतोष कांबळे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी रमेश भोसले, लेखापाल शिवाजी लोखंडे आदी उपस्थित होते.
त्यानंतर पिंपरी येथे झालेल्या कार्यक्रमास उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते विठठल ऊर्फ नाना काटे, नगरसदस्या अर्पणा डोके, अनुराधा गोरखे, नगरसदस्य संतोष लोंढे, संतोष कांबळे, माजी महापौर कविचंद भाट, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, माजी नगरसदस्या गिरीजा कुदळे, माजी नगरसदस्य उत्तम हिरवे, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, लक्ष्मण रुपनर, सुरेश गायकवाड, केशव ताजणे, वैजनाथ माळी, हनुमंत माळी, विलास गव्हाणे, विश्वास राऊत, मधुकर टिळेकर, सुर्यकांत ताम्हाणे, अनिल साळुंके, अण्णा आडसूळ, लहू अनारसे, विजय दर्शले, अमर ताजणे, शारदा मुंडे, नवनाथ होले, गिरीश वाघमारे,इश्वर कुदळे आदी उपस्थित होते.















