न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी-चिंचवड शहरवासीयांसाठी दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असताना, आज शहरातील नेहरू नगर येथे जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याचे समोर आले आहे. जलवाहिनी फुटल्यने संपूर्ण रस्ता जलमय झाला होता. रस्त्यावर पाणी साठल्याने नागरिकांना चालताना कसरत करावी लागत होती.
पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी महानगर पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांध्ये नाराजीचे वातावर आहे. यावर्षी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात मोठ्या प्रमाणावर जलसाठा आहे. तरी देखील आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.















