न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०१९) :- महाराष्ट्रात एकूण २८८ आमदार आहेत पण महेश लांडगे यांच्यासारखा दिलदार आमदार कधी पाहिला नाही, असे मत हभप समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी व्यक्त केले.
भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरी येथे निवृत्ती महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. दरम्यान या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.
यावेळी निवृत्ती महाराज म्हणाले, आपला माणूस मोठा होत असेल तर तो आपला स्वाभिमान आहे. आपल्या माणसाचा अभिमान बाळगत चला संपूर्ण राज्यात दुष्काळ होता परंतु, पुणे जिल्ह्यात कधी जाणवला नाही. कारण ही, संतांची आणि थोर राजे महाराजांची भूमी आहे. त्यामुळे या पवित्र भूमीत कधीच संकट येणार नाही. अथांग जमलेला जनसमुदाय हीच लांडगे यांची खरी संपत्ती आहे. आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वानी संकल्प करा, नद्या स्वच्छ ठेवा, वृक्षारोपण करा, अवयवदान करा, परिसरातील मंदिरे स्वच्छ ठेवा आणि स्वतःचे जीवन आदर्श करा आणि सर्वानी हे संकल्प केले तर हीच खरी महेश दादांना शुभेच्छा असेल.















