न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०१९) :- इंडिका कार शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास खराळवाडीकडून नेहरुनगरच्या दिशेने जात होती. कामगारनगर येथील महिंद्रा कंपनीसमोर कार आली असता कारने अचानक पेट घेतला. इंजिनमधून धूर निघून कार पेटल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच संत तुकाराम नगर येथील एक बंब घटनास्थळी दाखल झाला होता. अग्निशामक विभागाकडून लवकरच आग आटोक्यात आली. कोणतीही जीवितहानी नसल्याचे वृत्त आहे.















