- त्वरित कर भरणा करण्याचे ‘ ह ‘ प्रभाग समिती अध्यक्ष अंबरनाथ कांबळे यांचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील अनाधिकृत बांधकामाचे मिळकत कर आकारणी मिळकत धारकांकडून केली जात नसल्याचे आढळून आले आहे. त्याचप्रमाणे जुन्या मिळकतीवर बाढीव बांधकाम केलेले आहे. अशा वाढीव बांधकामाच्या नोंदी करण्यात आलेल्या नाहीत. त्या लवकारात लवकर करुन घ्याव्यात.
शहराचा विकास पाहता महापालिकेस एकमेव उन्पन्नाचे स्तोत्र असलेल्या विभागाला अपेक्षीत उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना नागरी सुविधा देणे, तसेच विकास कामांवर त्यांचा परिणाम होत आहे. ज्या मिळकती नवीन, वाढीव व वापरात बदल झालेल्या (निवासी / बिगरनिवासी) अशा मिळकतीच्या नोंदी केलेल्या नाहीत, त्यांनी त्वरीत संबंधीत करसंकलन विभागीय कार्यालयाकडे संपर्क साधून नोंदी करुन घ्याव्यात.
जे मिळकतधारक अथवा राजकीय पदाधिकारी, शासकीय कर्मचारी व उदयोगपती नोंदी करण्यास सहकार्य करत नसतील अशा मिळकतधारकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. अशा नोंदीच्या बाबत आजी / माजी नगरसदस्य अथवा राजकीय पदाधिकारी यांचा यामध्ये हस्तक्षेप झाल्यास त्यांचेवरही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, असे ह प्रभाग समिती अध्यक्ष अंबरनाथ कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.















