- आधार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भुंबे यांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २२०१९) :- भोसरी येथील १०० बेड चे अत्याधुनिक सुपरस्पेशालिस्ट रुग्णालय महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आले. त्यावरील सर्व यंत्रसामुग्री विकत घेऊन ते अद्याप सुरु न केल्यामुळे हे रुग्णालय धूळ खात पडुन आहे. ४ फेब्रुवारी २०१९ रोजी या रुग्णालय खासगीकरणाचा ठराव सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेत मंजूर केला.
या प्रकरणी होणारा विरोध पाहून तसेच पंतप्रधान, मुखमंत्री यांनी हस्तक्षेप करीत रुग्णालय खासगीकरणाच्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या. याशिवाय विविध सामाजिक संघटना व शहरातील अनेक पक्षांचा वाढत विरोध पाहून हे प्रकरण तीन महिन्यांनी पुन्हा सभागृहात ठेवू, असे आयुक्तांनी सांगितले.
डॉ. शंकर जाधव यांची महापालिकेच्या वतीने वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती फक्त कागदावरच झाली. त्यानंतर हे रुग्णालय महानगरपालिकेने चालवावे हे सत्य असली तरी यावर अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. शहरातील नागरिक हे रुग्णालय कधी सुरु होणार याची वाट पाहतायत. मात्र, महापालिका प्रशासन याबाबत सुस्त आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आपली बदली होण्याअगोदर हे रुग्णालय सुरु करण्याचे आदेश द्यावेत, असे आधार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भुंबे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


















