न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ डिसेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर संकलन विभागामार्फन (दि. १८ / ११ / २०१९ पासून शहरातील बिगरनिवासी मिळकतींचे सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे. आज अखेर सुमारे १८, ६०० बिगरनिवासी मिळकतींचे सर्वेक्षण केले असून त्यामध्ये ४, ७५० नवीन, ९०० वाढीव बांधकाम व ३६० वापरात बदल अशा एकूण ६,०१० मिळकती आढळून आल्या आहेत. महापालिका हद्दीमध्ये दिनांक ०७ / १२ / २०१९ अखेर बिगरनिवासी मिळकत मर्हेक्षण मोहिम राबविण्यात येणार आहे.
नागरिकांनी मिळकत सर्हेक्षणाकामी येणा-या करसंकलन विभागाने अधिकारी व कर्मचारी यांना मिळकतीची माहिती देऊन सहकार्य करावे. सर्वेक्षणाचे कामकाजाम विरोध अथवा अडथळा निर्माण केल्यास संबंधितांबर कायदेशीर कारवाई करणेत येईन. ज्या नागरिकांनी अद्याप त्यांचे मिळकतीचे नवीन, वाढीव, वापरात बदल याबाबत करसंकलन विभागाकडे नोंद करुन कर आकारणी केलेली नाही, अशा मिळकतधारकांनी करसंकलन विभागाने सर्वेक्षण करणारे कर्मचारी अथवा संबंधित विभागीय कार्यालयान लेखी अर्ज करून कर आकारणी निश्चित करुन घ्यावी. तसेच नागरिकांना आकारणी न झालेल्या नवीन, वाढीव अथवा बदल झालेल्या मिळकती निदर्शनास आलेस त्यांनी ९८९०३५०६६२ या Whatsapp क्रमांकावर मिळकतीचे पत्यासह फोटो उपलोड करावेत.
तसेच मिळकत कराची रक्कम रुपये ५ लाखपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या मिळकतींवर लवकरच जप्तीची कारवाई सुरु करणेत येणार आहे. सर्व थकबाकी असलेल्या मिळकतधारकांनी मिळकत कराची थकबाकी भरणा करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे व मिळकत जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, करसंकलन विभाग यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.















