न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ डिसेंबर २०१९) :- लोणावळा ग्रामीण परिसरातील तुंग येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रगतशील शेतकरी आणि व्यवसायिकांच्या नावाने जादूटोणा केल्याची घटना उघडकीस आली आहे. काळ्या बाहुल्यांवर व्यक्तींचे फोटो लावून लिंबू, खिळे, बिबा, टाचणी मारून झाडाला ठोकल्याचं समोर आलं आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित नऊ जणांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांत धाव घेतली असून तक्रार दिली आहे.
पांडुरंग कृष्णा जांभुळकर, संदीप एकनाथ पाठोर, संजय धोंडू कोकरे, किसन बंडू ठोंबरे, योगेश श्रीराम घाडगे, संतोष कोंडीबा घारे, अजय कुमार मेहता, कैवशर शेख, मनोज सेनानी अशी या प्रगतशील शेतकरी आणि व्यवसायिकांची नावं आहेत. जादूटोणा करण्यासाठी यांचे फोटो वापरण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.












