न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ डिसेंबर २०१९) :- पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन महिन्यांपासून साथीच्या आजाराने धुमाकुळ घातला आहे. त्यातच आता पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना चिकुन गुनियाची लागण झाली आहे.
शहरातील नद्यांमधील पुराच्या पाण्याचा निचरा वेळेत आणि योग्य पद्धतीने न झाल्यामुळे शहरात साथीच्या आजारांना सुरुवात झाली होती. महापालिका प्रशासनाने यावर तात्काळ नियोजन न केल्यामुळे काही प्रमाणात अद्यापही शहरात साथीच्या आजाराचे रुग्ण सापडत आहेत.












