न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०१९) :- पवना नदीवरील ताथवडे स्मशानभूमीजवळ बुधवारी (दि. ४) रोजी अनेक मासे व एका कासवाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले होते. पवना नदीपात्रातील प्रदुषणामुळे मासे व कासव यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पिंपरी चिंचवड महापालिकेला नोटीस बजावली आहे.
तुमच्याविरूद्ध खटल्याचा प्रस्ताव का दाखल करू नये, असे त्यामध्ये म्हटले आहे. तसेच, याबाबत महापालिकेला येत्या दहा दिवसांत पवना कृती आराखडा ( अॅक्शन प्लॅन ) सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. नदीत मासे व कासवाच्या मृत्यूनंतर महापौर माई ढोरे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर आगपाखड केली होती. आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला धारेवर धरले आहे. एकंदरीत पवना प्रदूषण हे महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये वादाचा मुद्दा ठरु लागला आहे . पवना नदीपात्रात बुधवारी ( दि .
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने बजावलेली नोटीस अद्याप बघितलेली नाही. त्यामुळे त्याबद्दल बोलणे उचित ठरणार नाही. संबंधित नोटीस पाहिल्यानंतरच याबाबत बोलता येईल. महापालिकेला यापूर्वी बजावलेल्या नोटीसीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे बँक गॅरंटीचा उल्लेख नव्हता. त्यांनी पवना नदी प्रदुषणाबाबत काय कार्यवाही करणार याविषयी विचारणा केली होती. त्यानुसार महापालिकेतर्फे अहवाल सादर केला होता.
– मकरंद निकम, सहशहर अभियंता, महापालिका.












