न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०१९) :- पिंपरी-चिंचवड शहराला दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. या विरोधात मनसेच्या महिला शहराध्यक्ष आश्विनी बांगर यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. यामुळे पोलिसांची भंबेरी उडाली होती.
शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मनसेच्या आश्विनी बांगर यांनी ‘ब’ प्रभाग येथील पाण्याच्या टाकीवर चढून घोषणाबाजी करत शोले स्टाईल आंदोलन केले. यावेळी शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी मनसे महिला शहराध्यक्ष आश्विनी बांगर यांनी केली आहे.
दरम्यान, या आंदोलनामुळे पोलिसांची भंबेरी उडाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी हे आंदोलन करत, महानगरपालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. तब्बल दीड तास हे आंदोलन सुरू होते. आंदोलन करणाऱ्या बांगर यांना ताब्यात घेतलं आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.












