न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०१९) :- निगडीमधील काचघर चौकात एक तरुण गांजा घेऊन येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी परिसरात सापळा रचून सचिन याला ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ सुमारे २ किलो १२५ ग्रॅम वजनाचा अंदाजे ५३ हजार १२५ रुपयांचा गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजासह गुन्ह्यासाठी वापरलेली ३० हजार रुपयांची दुचाकी व रोख ४०० रुपये पोलिसांनी जप्त केले.
सचिन शंकर पवार (वय २६ रा. काळभोरगोटा, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई अजित लिंबराज कुटे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.












