न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरात वृक्ष लागवडीसाठी पोषक वातावरण तयार केलेले असताना, कुदळवाडी, चिखली भागातील कुदळवाडी-मोई फाटा ते पवारवस्ती उड्डाणपुल रस्त्यावरील रस्ता दुभाजकावर महानगरपालिकेने लावलेल्या झाडांकडे दुर्लक्ष केलेले दिसते.
याबबत पिंपरी चिंचवड महापालिकेचे ‘फ’ प्रभागाचे स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना पत्र दिले आहे. या झाडांना दैनंदिन पाणी घालणे गरजेचे आहे. तसेच या झाडांच्या वाढीसाठी खताची तसेच औषध फवारणीची देखील व्यवस्था होणे आवश्यक आहे.
तसेच सदरची झाडे काही प्रमाणातच उगवलेली असून ब-याच ठिकाणी झाडे उगवलेली नाहीत, त्यामुळे ज्या ठिकाणी झाडे आलेली नाहीत, त्या ठिकाणी पुन्हा वृक्षरोपण करण्यात यावे, अशी मागणी यादव यांनी पत्राद्वारे केली आहे.












